• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

धनंजय मुंडे प्रकरणाला आता वेगळे वळण ; “मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न ” : “या” भाजप नेत्यांनी केले मुंडेवर आरोप करणाऱ्या महिलेवर गंभीर आरोप

tdadmin by tdadmin
January 14, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.


या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे.

 


“मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.


“दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं.“आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन निष्कर्ष काढावा” अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.

Join Free WhatasApp  माणदेश एक्सप्रेस न्युज

Tags: #bjp#KRUSHNAHEGDE
Previous Post

भारतात नव्या स्ट्रेनची संख्या पोहचली शंभरी पार ; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

Next Post

“आता तुम्हीच म्हणा ‘धिस ईज अ राईट टाईम’” : प्रकाश आंबेडकर

Next Post

“आता तुम्हीच म्हणा ‘धिस ईज अ राईट टाईम'” : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

एकूण वाचक

  • 130,432

ताज्या बातम्या

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची क्लीन चीट

जळगावमधील महिला शोषण प्रकरणात गृहमंत्र्यांची क्लीन चीट

March 4, 2021
पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार

पोलिस पाटलांना आता इतर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच कलम ३५३चे संरक्षण मिळणार

March 4, 2021
“सरकारचा दबाव ना पोलीस यंत्रणेवर आहे, ना प्रशासनावर” : भाजप नेत्या आक्रमक

“सरकारचा दबाव ना पोलीस यंत्रणेवर आहे, ना प्रशासनावर” : भाजप नेत्या आक्रमक

March 4, 2021
धक्कादायक : कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न

धक्कादायक : कोव्हिड सेंटरमध्ये डॉक्टरचा रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न

March 4, 2021
“अफवांवर विश्वास ठेवू नका, लस जरी घेतली, तरी मास्क लावा” : रावसाहेब दानवे यांचे जनतेला आवाहन

“अफवांवर विश्वास ठेवू नका, लस जरी घेतली, तरी मास्क लावा” : रावसाहेब दानवे यांचे जनतेला आवाहन

March 4, 2021
“शासनाचे चार खाते मंत्री किंवा अधिकारी नाही, तर वेगळीच माणसं चालवतात” : भाजप नेत्याने केला गंभीर आरोप

“शासनाचे चार खाते मंत्री किंवा अधिकारी नाही, तर वेगळीच माणसं चालवतात” : भाजप नेत्याने केला गंभीर आरोप

March 4, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143