मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी यूपीएचे नेतृत्व करावे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता काँग्रेससह भाजपकडून प्रतिक्रिया आली असून, देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना राऊतांचा ‘सोळावा गडी’ असा उल्लेख करत टोला लगावला आहे.
राऊतांच्या यूपीए नेतृत्वाबदलच्या मागणीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, युपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार कोण कॅप्टन हे ठरत नसतं. त्यासाठी टीममध्ये असायला लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो, असा खोचक टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, संजय राऊतांकडून सातत्याने यूपीएच्या नेतृत्वासाठी शरद पवारांच्या नावाचा अग्रह धरला जात आहे. देशात अनेक घडामोडी घडत आहेत अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसबाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यातील प्रादेशिक पक्षांची मागणी आहे. आज युपीए अंत्यत विकलांग अवस्थेत आहे. युपीएची ताकद कमी झाली असून युपीएचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी करावं, असं राऊत म्हणाले होते.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस