आटपाडी : देशमुखवाडी ग्रामपंचायतीची सरपंच व उपसरपंच पदाची निवड गणपूर्ती अभावी तहकूब करण्यात आली.
माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाचे सदस्य गैरहजर राहिले तर विरोधी गटाचे तीन सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. सरपंच पदासाठी शीतल फतेसिंह देशमुख व उपसरपंच ज्ञानू खडसरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु निवडणूक प्रकियेसाठी गणसंख्या भरली नसल्याने निवडणूक प्रकिया तहकूब करण्यात आली.
माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख गटाच्या सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील गटाचे सदस्य सरपंच, उपसरपंच निवडीसाठी उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस