मुंबई : वाझे प्रकरणात टीका झाल्यानंतर अखेर सरकारकडून पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या. विरोधी पक्षाकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची देखील सातत्याने मागणी करत आहे.
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदावरून हटवून त्यांच्या जागी आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मंत्रीपद देणार असल्याची चर्चा आहे. यावर आता राजेश टोपेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी शिस्तीचा पक्ष असून सर्व निर्णय पवार साहेबच घेतील. मात्र गृहमंत्रिपद अनिल देशमुख यांच्याकडेच राहणार आहे. त्यांच्यावर राजीनामा देण्याची वेळच येणार नाही, असे स्पष्ट करत टोपेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस