
म्हसवड : माणगंगा नदीवरील वरकुटे ता. माण, जि. सातारा येथील काटकरवस्ती जवळील बंधारा बांधुन पूर्ण झाला असुन त्याला दारे बसविल्यास त्यातून पाणी साठ्विल्यास त्या पाण्याचा फायदा परिसरातील शेतकरी वर्गाला होईल. त्यामुळे या बंधाऱ्याला दारे बसविण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या मधून होत आहे.
कधी नव्हे तो माण तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे जुन महिन्यापासून माणगंगा नदी वाहत आहे. परिसरात पावसाचे पडलेले सर्व पाणी सध्या माणगंगा नदीतून वाहून आहे. जर पाणी वाहत असतानाच दारे बसविले तर येथून पुढच्या काळात या परिसरातील शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची कमतरता जाणवणार नाही.
गेल्या दहा वर्षापासून या बंधाऱ्याचे काम रखडले होते पण गावकऱ्यांची व सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी केलेल्या प्रयत्नाला शासनाच्या जलसंधारण विभागाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे मार्चमध्ये हे काम पूर्ण झाले.
काम पूर्ण झाले त्यानंतर पाऊसही चांगला झाला. त्यामुळे जूनपासून आजपर्यंत नदीपात्रातुन पाणी वाहत आहे. त्याचा फायदा परिसरातील शेतकरी वर्गाला होण्यासाठी आता या बंधाऱ्याला दारे बसविल्यास परिसरातील शेकडो हेक्टर जमिनीला व वरकुटे, वाकी, माळवाडी येथील पाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडणार नाही. त्यामुळे या बंधाऱ्याला तातडीने फळ्या बसवण्यात याव्यात अशी मागणी वाढु लागली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
