मुंबई : महिला वन अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार हे एकटे जबाबदार नाहीत. दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता शिवकुमार यांना वेळोवेळी पाठीशी घालणारे अपर मुख्य प्रधान वन सरंक्षक रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून निलंबित करून अटक करण्याची आमची मागणी आहे अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.
मात्र, सरकारनं रेड्डी यांची बदली करून त्यांना अभयच दिलं आहे. दीपाली चव्हाण यांची हत्या या व्यवस्थेनं केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरू झाले आहेत. शिवकुमार यांची तीन दिवसाची पोलिस कोठडी सोमवारी संपल्यावर त्यांच्या जामीनासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील. त्यामुळं शिवकुमारसह रेड्डी यांच्यावरही ३०२ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस