मुंबई : कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या या मागणीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावलाय.
‘बेळगावचा समावेश केंद्र शासित प्रदेशात व्हावा म्हणून सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. जरूर करा, परंतु त्या आधी तुमच्या हाती असलेल्या राज्यात औरंगाबाद चे संभाजीनगर तर करा.. नाही तर झेपत नाही म्हणून जाहीर करा’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
