सांगली : सन 2020-21 मध्ये जिल्हा परिषद स्वियनिधी अंतर्गत (सर्वसाधारण) लोकनेते राजारामबापू पाटील 50 टक्के अनुदानावदर 10 + 1 (10 शेळ्या + 1 बोकड) शेळी गट वाटप या योजनेंतर्गत लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्याची मुदत दि. 19 जानेवारी 2021 ते 15 फेब्रुवारी 2021 आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी दिली.
योजनांचा विहीत नमुन्यातील अर्जाचा नमुना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.sangli.nic.in या संकेतस्थळावर (जिल्हा पशुसंवर्धन विभाग) प्रसिध्द करण्यात आला आहे. तालुकानिहाय लोकसंख्येच्या प्रमाणानुसार प्रत्येक तालुक्यांचा लक्षांक पुढीलप्रमाणे आहे. मिरज – 10 (3 महिला व 7 पुरूष), एकूण उद्दिष्टापैकी अपंग 1, कवठेमहांकाळ – 4 (1 महिला व 3 पुरूष), जत – 9 (3 महिला व 6 पुरूष), आटपाडी – 4 (1 महिला व 3 पुरूष), खानापूर – 3 (1 महिला व 2 पुरूष), तासगाव – 5 (2 महिला व 3 पुरूष), वाळवा – 10 (3 महिला व 7 पुरूष), एकूण उद्दिष्टापैकी अपंग 1, शिराळा – 3 (1 महिला व 2 पुरूष), पलूस – 3 (1 महिला व 2 पुरूष), कडेगाव – 5 (2 महिला व 3 पुरूष)
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस