सदाशिवनगर/प्रतिनिधी : सदाशिवनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचे औचित्य साधून आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून नामांतर लढ्यात योगदान दिलेल्या लढाऊ पँथर पदाधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सदाशिवनगर शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
पी.एस. गायकवाड, एन. के. साळवे , नंदकुमार केंगार, दयानंद धाईंजे, शामराव भोसले, भारत आठवले, अरुण ओवाळ, दत्तात्रय कांबळे, श्रावण सोरटे, एस.एम. गायकवाड, अशोक धाईंजे, अरुण पवार, दशरथ बनसोडे, आबा सावंत, कैलास ओवाळ, बाळू ओवाळ, तानाजी सावंत आदी पदाधिकाऱ्यांचा या वेळी हार, फेटा, गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख सत्कार मुर्तीं पी..एस गायकवाड, एन.के. साळवे, नंदकुमार केंगार, दयानंद धाईजे, शामराव भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले, तालुका सरचिटणीस शहराध्यक्ष राजेंद्र जाधव, सरचिटणीस अशोक खांडेकर, कार्याध्यक्ष राम बनसोडे, आय टी सेल प्रमुख प्रवीण साळवे, अभिजीत वाघमारे, गणेश ओवाळ, पुष्कर धाईंजे, हनुमंत बिरलिंगे, अण्णा गेजगे, तुकाराम जाधव, सागर बनसोडे, अनिकेत निचळ, सुरज सावंत, सुजित भोसले, विश्वतेज सरतापे आदी उपस्थित होते. तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे यांनी सूत्रसंचालन तर आभार शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी मानले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
