पुणे : भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे निलेश राणे यांनी ट्वीट करून ‘अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत. पण कसंतरी उपमुख्यमंत्रिपद मिळालं होतं पण आता 2 उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. म्हणजे, अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’ असा टोला निलेश राणेंनी लगावला होता.
यावर आता अजित पवार यांनी आपल्या शैलीत निलेश राणेंना चांगलाच टोला लगावला. ‘कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, उगाच कशाला कुणाचं नाव घेऊन त्यांना मोठं करायचं, असं म्हणत अजित पवार यांनी निलेश राणे यांचं नाव न घेता सणसणीत टोला लगावला आहे.
तसंच, राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे फॉर्मुला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल नाही, असं पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कर कमी केले तर पेट्रोलच्या दरात कपात करता येईल, असा सल्ला दिला होता, याबद्दल पत्रकारांनी विचारले असता, अजित पवार म्हणाले की, त्यांना सांगा आधी केंद्रातले कर कमी करा मग राज्य सरकार विचार करेल’ असा टोलाही पवारांनी लगावला.
नाना पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कुणीही नाराज नाही. त्यांनी जर अधिवेशन झाल्यानंतर राजीनामा दिला असता तर अधिक बरे झाले असते. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
