
मुंबई : कृषी कायद्यांना स्थगिती देण्यासोबतच न्यायालयाने 4 सदस्यीय समिती नेमली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पटला नसून, त्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. या कायद्याचे समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमली असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केला आहे.
राजू शेट्टी ट्विट करत म्हणाले की, न्यायालयाने शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला आहे. कायद्यांना स्थगिती देऊ, आंदोलन मागे घ्या. कायद्यांचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे. समिती अदानी व अंबानींना सोयिस्कर होईल असा रिपोर्ट देतील, तो कायद्याच्या स्वरुपात तुमच्या बोकांडी बसवतो असंच कदाचित सुप्रीम कोर्टाला म्हणायाचे असेल, असे म्हणत राजू शेट्टींनी न्यायालयाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
