आटपाडी : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२०/२१ च्या पहिल्या टप्यातील आटपाडी तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी मतदान झाले असून १६८ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून ते आज उघणार आहे.
तालुक्यातील विठ्ठलापूर, घरनिकी, धावडवाडी, पात्रेवाडी, देशमुखवाडी, शेटफळे, बोंबेवाडी, तळेवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे या ग्रामपंचायतीसाठी मतदान संपन्न झाले. यामध्ये सर्वच गावामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये शेटफळे व विठ्ठलापूर ग्रामपंचायतसाठी काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर चौरंगी लढती होत आहेत.
आज या सर्व ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होणार असून मतमोजणीसाठी तहसील कार्यालयामध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून थोड्यात वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस