पुणे : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्रासह राज्याच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा कहर पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीचा पुरवठा वाढवा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे.
राज्यात काल दिवसभरात 24 हजार 645 रुग्ण आढळून आले आहेत. काल नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस