पुणे : पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला असून शहरातील हॉटेल रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय झाला असून रात्री 11 ते पहाटे सहा या काळात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये हॉटस्पॉट भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रभावी नियोजन, प्रतिबंधित क्षेत्रे यांची प्रभावीपणे अंमलबजावणी, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरी जाऊन सुपर स्प्रेडर रुग्णांचे सर्वेक्षण, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या ताप सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक, संपर्क शोध मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे धोरण, नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन, पालकमंत्री अजित पवार यांनी केले असून अधिकाऱ्यांना त्याबाबत तसा आदेश दिला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस