मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण होत आहे. नुकतंच राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे.
माझा कोरोना तपासणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्यामुळे मी डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगिकरणांत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सर्वाना विनंती आहे की, शासनाच्या सूचनांचे पालन करावे,आपल्या घरातील सदस्यांची काळजी घ्यावी, मास्क वापरा, विनाकारण घराबाहेर पडू नका, असेही ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस