मुंबई : आज काँग्रेस शिष्टमंडळाची झूम मिटिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक पार पाडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या कलाकारांवर कोणाचा दबाव आहे का याची चौकशी करु असं म्हणाले. यावर मला एक प्रश्न पडलाय कोरोना अनिल देशमुखांना झालाय की त्यांच्या मेंदुला,’ अनिल देशमुखांना कोरोना झालाय, त्याचा परिणाम मेंदूवरही होतो म्हणे. देशमुख जरा आपली योग्यता लक्षात घेऊन बोलत जा. तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा ईशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील, त्यांचा आदर दुनिया करते.असं धक्कादायक विधान भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केलं आहे.
‘राजकारणासाठी अशा प्रकारची विधानं हे राज्य सरकार करत आहेत. येणाऱ्या काळात राज्याची जनता भारतातील प्रतिभावन व्यक्तींच्या विरोधात असं वक्तव्य करणाऱ्या सरकारला धडा शिकवेल,’ असेही भातखळकर म्हणाले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
