मुंबई : मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातूनच कोरोना वाढला असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे.
मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमंलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईकरांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मुंबईतील कोविड सेंटर आणि बेड्स पुरेसे आहेत. याआधी कोरोनाचा जो प्रोटोकॉल पाळण्यात आला. तोच आताही पाळण्यात येईल. तसे आदेशच आले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबईत 921 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 19 हजार 128 झाला आहे. सद्यस्थितीत मुंबईत एकूण 5859 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज