नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन सुरु ठेवण्यासाठी पैसा, भाज्या, तूप आणि दारु पुरवा, असे वादग्रस्त वक्तव्य हरियाणातील महिला काँग्रेस नेत्या विद्या देवी यांनी केले आहे.

गेल्या निडणुकीत आपला पराभव झाले आहे. काँग्रेसचं अस्तित्वच संपुष्टात येण्याची भीती आहे. पण शेतकरी आंदोलनाने आपल्या उभारी मिळू शकते. काँग्रेसचा पुनर्जन्म होईल, असे म्हणताच विद्या देवी यांनी प्रत्येकाने आता या आंदोलनासाठी मदत देऊ केली पाहिजे. पैसे द्या, अन्नधान्य द्या, भाजीपाला द्या, तूप द्या एवढंच काय ते दारू ही देऊ शकता, ज्याला जे योग्य वाटतं त्यांनी ती मदत करावी आणि या शेतकरी आंदोलनाला बळ द्यावे, असे वक्तव्य केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
