नवी दिल्ली : बिग बॉस १० मधील वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांचं आज निधन झालं. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. रिपोर्टनुसार, त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. बुधवारी त्यांनी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. स्वामी ओम यांच्यावर दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वीच त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून स्वामी ओम बरे झाले पण त्यानंतर त्यांना चालायचा त्रास होऊ लागला. स्वामी ओम यांचे अंत्यदर्शन दुपारी दिल्लीतील निगम बोध घाटात केले जाईल. 2017 मध्ये खासगीपणाच्या अधिकाराची पायमल्ली केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्वामी ओम यांना 10 लाख रुपयांचा दंड होता. याशिवाय अनेक वादग्रस्त वक्तव्यांसाठी स्वामींचं नाव चर्चेत होतं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
