• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

“शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी” : काँग्रेसकडून औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला प्रत्युतर

tdadmin by tdadmin
January 17, 2021
in राजकीय
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : औरंगाबादच्या नामांतरावरून आता शिवसेना-काँग्रेसमध्ये ‘सामना’ रंगू लागला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सेक्युलरवादावरून काँग्रेसवर निशाणा साधला होता. या टीकेनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेला लक्ष्य करत काही सवाल केले आहेत.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘सामना’तील संजय राऊतांच्या लेखाला उत्तर दिलं आहे. “औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडविला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे.

 

काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्यां ची संख्या वाढत चालली आहे, मात्र मागील पाच वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?,” असा सवाल थोरात यांनी शिवसेना-भाजपाला केला आहे.


“गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे,” असं थोरात म्हणाले.


भाजपाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे, त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्यातकडे जनता करमणूक म्हणून बघते आहे. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही.

 

आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शाच्या मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही आणि कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,” असा इशारा देत थोरात यांनी नामांतराबद्दलची भूमिका स्पष्ट केली.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? pic.twitter.com/Zvd437Ufym

— Balasaheb Thorat (@bb_thorat) January 17, 2021

Tags: #balasahebthorat
Previous Post

‘दलित पँथर चळवळ आमचे प्रेरणास्थान : सोमनाथ भोसले ; आंबेडकर चळवळीमध्ये योगदान दिलेल्या पँथर पदाधिकाऱ्यांचा सन्मान

Next Post

‘अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे खूपच धक्कादायक!’ : ‘या’ काँग्रेस नेत्याने केली शंका व्यक्त

Next Post

‘अर्णब गोस्वामी यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे खूपच धक्कादायक!’ : ‘या’ काँग्रेस नेत्याने केली शंका व्यक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“मला विरोधी पक्षनेत्यांची कीव करावीशी वाटते” : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 28, 2021
‘आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे’ : राज्यपाल

‘आपल्या पाल्यांचे प्राथमिक शिक्षण मराठीत देण्याचे ठरविले पाहिजे’ : राज्यपाल

February 28, 2021
पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

पूजा चव्हाणच्या आईवडिलांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली ही मागणी

February 28, 2021
“तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे” : चंद्रकांत पाटील

“तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे” : चंद्रकांत पाटील

February 28, 2021
खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

खरच वनमंत्री “वाघिणीला” घाबरले वाटते…..

February 28, 2021
आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

आटपाडी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले ; आज दिनांक २८ रोजी ०४ नवे रुग्ण

February 28, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143