मुंबई : राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळेच नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नवा विधानसभा अध्यक्ष कोण असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

नाना पटोले आज दुपारच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी त्यांचे आभार मानले. त्यानंतर नाना पटोले थेट विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला.
पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, ज्या काँग्रेस नेत्याला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येईल, त्याचं आताचं खातं पटोले यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाकरे सरकारमधील काँग्रेसच्या विद्यमान मंत्र्यालाच उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. म्हणजे त्याच्याकडील आताचं खातं पटोले यांच्याकडे दिलं जाईल आणि त्यामुळे मंत्रिपदाबाबतची खळखळ होणार नाही, अशा प्रकारची काँग्रेसची रणनीती असल्याचं राजकीय सूत्रांनी सांगितलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
