• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

धनंजय मुंडे यांच्या विरोधात मुंबईत बलात्काराची तक्रार ; बदनामी आणि ब्लॅकमेल करण्यासाठी खोटे आरोप : धनंजय मुंढे

tdadmin by tdadmin
January 12, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून आपण मुंडेंचे नातेवाईक असल्याचा दावाही या तरुणीने केला आहे. तरुणीने 10 जानेवारी रोजी तक्रार दिली होती. 11 तारखेला मुंबई पोलिसांनी तरुणीचा अर्ज स्वीकारला. दरम्यान धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे

कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्कारावर आरोप करण्यात येत आहेत. सदर प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो . हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असून या प्रकरणाची संपूर्ण वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे.


करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. सदर परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे.


सदर करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत.


मात्र 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. या बाबत दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.


नोव्हेंबर 2020 मध्ये श्रीमती करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर माझी बदनामी करण्याच्या हेतुने व मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी मा. उच्च न्यायालयात श्रीमती करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.


सदर याचिकेत मा. उच्च न्यायालयाने श्रीमती करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी मा. उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात श्रीमती करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी मा. उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही. माझी या संदर्भात प्रसार माध्यमांना देखील विनंती आहे की या प्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेवर परिणाम होईल म्हणून अधिक भाष्य टाळावे अशी विनंती आहे.
तथापि कालपासून रेणू शर्मा ज्या या करुणा शर्मा यांच्या भगिनी आहेत यांनी माझ्या विरुद्ध खोटे आणि बदनामीकारक व माझ्यावर लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप केल्याची पोस्ट प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे तसेच त्यांनी या संदर्भात विविध प्राधिका-यांकडे केलेल्या तक्रारीच्या प्रति देखील समाज माध्यमातून प्रसारित केल्या आहेत. या सर्व तक्रारी खोट्या आहेत, व श्रीमती करुणा शर्मा, त्यांची बहीण रेणू शर्मा व त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा यांच्या मला ब्लॅकमेल करणे व माझ्या कडून खंडणी वसूल करण्याच्याच योजनेचा एक भाग आहे.


माझ्याकडे श्रीमती रेणू शर्मा यांनी त्यांच्या मोबाईल वरून मला ब्लॅंकमेलिंग कोट्यवधी रुपये मागितल्याचे sms रुपी पुरावे आहेत. तसेच मी मा. उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये श्रीमती करुणा शर्मा यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो.


मला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापी माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी श्रीमती करूना शर्मा यांच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे.


हे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.”

तरुणीने काय केले आरोप ?
तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, 2006 पासून माझ्यावर अत्याचार सुरू होते. पुढे बॉलिवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध ठेवले. तसेच याचे व्हिडिओ काढून धमकावले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

I have lodged complaint of Rape @MumbaiPolice @CPMumbaiPolice against #DhananjayMunde no action till now @PawarSpeaks @supriya_sule @UdhavThackeray . Oshiwara police station is not even accepting my written complaint @Dev_Fadnavis my life is in threat please help @narendramodi pic.twitter.com/mf4ZlHxd6A

— renu sharma (@renusharma018) January 11, 2021

Tags: #Dhanjay Munde#Renu Shrarma
Previous Post

दिघंचीतील गिड्डे वस्ती बंधाऱ्याचा प्रश्न निकाली : आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांनी दिलेला शब्द पूर्ण केला

Next Post

आटपाडी तालुक्यातील आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ०४ तर सांगली जिल्ह्यात १९ नवे रुग्ण

Next Post

आटपाडी तालुक्यातील आज दिनांक १२ रोजी कोरोनाचे ०४ तर सांगली जिल्ह्यात १९ नवे रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या परीक्षा अशा पद्धतींनी घेतल्या जाणार’ : उदय सामंत यांची घोषणा

February 27, 2021
“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

“त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात” : कॉंग्रेस नेत्याचा दावा

February 27, 2021
सावधान : तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ; गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

सावधान : तुम्हाला कॉल, मेसेज किंवा ईमेलद्वारे पाठवल्या गेलेल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका ; गृहमंत्रालयाकडून अलर्ट जारी

February 27, 2021
‘राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे’ : भातखळकर

‘राजा हरिश्चंद्राने उद्धव ठाकरेंच्या रूपात पुनर्जन्म घेतला आहे’ : भातखळकर

February 27, 2021
…तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता : कॉंग्रेस नेत्याने दिले भाजपाला प्रत्युत्तर

…तर फडणवीस सरकारने तेव्हाच गुन्हा दाखल केला असता : कॉंग्रेस नेत्याने दिले भाजपाला प्रत्युत्तर

February 27, 2021
पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

पदोन्नतीतील आरक्षण बाबत महाराष्ट्र शासनाकडून दिशाभूल : रिपब्लिकन स्टुडंट युनियन

February 27, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143