मुंबई : सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील कोविशिल्ड ही लस आता 200 रुपयांहून कमी किमतीत मिळेल. सर्व कर वगळून एका डोसची किंमत 200 रुपयांहून कमी असेल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. खासगी रुग्णालयात मात्र ‘लस’चा एक डोस सध्या 250 रुपयांना दिला जात आहे. तर सरकार आता सीरमकडून कोविशिल्ड ‘लस’चा एक डोस सर्व कर वगळता 150 रुपयांहून कमी किंमतीत घेणार असल्याचे आरोग्य मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
देशात आतापर्यंतच्या लस देण्यात आलेल्या नागरिकांमध्ये 71 टक्के लसीकरण हे सरकारी केंद्रावर आणि 29 टक्के लसीकरण हे खासगी रुग्णालयाच्यामार्फत करण्यात आले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे कोरोनावरील लसीकरण मोहीमही वेगात सुरू आहे. कुठल्याही राज्यात लसीचा तुटवडा नाहीए, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस