• Home
mandeshexpress
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
mandeshexpress
No Result
View All Result

‘कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही’ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

tdadmin by tdadmin
January 27, 2021
in महाराष्ट्र
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Twitter


मुंबई : कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही ते म्हणाले आहेत. “महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प” पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. पुस्तकातून नव्या पिढीली महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची माहिती देण्यात आली असून महाराष्ट्राची भूमिका मांडण्यात आली आहे.


उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंनी सीमावादावर केलेल्या आंदोलनाची आठवण सांगितली. सीमाभागासंबंधी निवेदन देण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या ताफ्यासमोर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर झालेला घटनाक्रम उद्धव ठाकरे यांनी उलगडला. “आम्ही तेव्हाही कलानगरला राहत होतो. दादरला शिवाजी पार्कला जिथे घर होतं तिथे मार्मिकची कचेरी होती. मी सात-आठ वर्षांचा होतो. गोळीबार, लाठीमार झाल्याचे फोन यायचे. पंढरीनाथ सावंत अश्रूधुराच्या रिकाम्या नळकांड्या घेऊन आले होते. आम्ही अडीच तीन वाजता घरी निघाल्यानंतर गाडीत बाळासाहेब, माँ आणि मी होतो. बाळासाहेबांनी आमची बॅग भरुन ठेवा, उद्या बहुतेक सुर्योदयाच्या आधी आमची उलचबांगडी होणार सांगितलं आणि तसंच झालं,” अशी आठवण उद्धव ठाकरेंनी सांगितली.


“आपण ज्याप्रकारे कायद्याचा विचार करतो तसं कर्नाटक सरकार करत नाही. हा विषय केवळ तेवढ्यापुरता बोलण्याचा नाही. कर्नाटकमध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार असो, कोणीही मुख्यमंत्री असो…मराठी लोकांवर अत्याचार करायचा यावर त्याचं दुमत नसतं. त्याचप्रमाणे हा भूभाग जो कर्नाटकव्याप्त आहे तो माझ्या राज्यात आणणारच असं एकत्रितपणे लढलो तर हा प्रश्न सुटेल,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. “जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात आहे तोपर्यंत हा भूभाग केंद्रशासित का केला जाऊ नये?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे.


“माझ्याकडे अनेकजण आमच्यासाठी तिथे मराठी शाळा सुरु करण्याची मागणी करतात. हरत नाही…एकदा आल्यानंतर तुम्ही आमचेच आहात. कर्नाटकनेही कधी केलं नसेल एवढं मोठं काम तुमच्यासाठी केल्याशिवाय राहणार नाही. नावाप्रमाणेच ते ‘बेलगाम’ वागत आहेत. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत आपल्या सरकारने हा भूभाग केंद्रशासित करण्याची मागणी कोर्टात केली पाहिजे. कर्नाटक सरकारची मस्ती अजिबात चालू देणार नाही,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस

Tags: #Shivsena#udhhavthakre
Previous Post

सौरव गांगुलीची प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल

Next Post

भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यावर गोळीबार ; गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

Next Post

भारतीय जनता पक्षाच्या बड्या नेत्यावर गोळीबार ; गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

आटपाडीच्या आठवडी बाजरातील गर्दी टाळा : सरपंच वृषाली पाटील यांचे नागरिकांना आवाहन

February 26, 2021
आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

आटपाडीतील उद्याचा आठवडा शेळी-मेंढी बाजार कोव्हीडचे नियम पाळून होणार : सचिव शशिकांत जाधव

February 26, 2021
आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

आगामी चार राज्यातील निवडणुकीसाठी रामदास आठवले यांच्या पक्षाला मिळाले “हे” निवडणूक चिन्ह

February 26, 2021
“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

“अरुण राठोडला ओळखत नाही, आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू” : पूजाच्या आईने केला धक्कादायक खुलासा

February 26, 2021
“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

“महाविकास आघाडी सरकार हे किमान-समान कार्यक्रमावर उभे राहिलेलं सरकार” : नाना पटोले

February 26, 2021
“गुजरात सरकारने आपली चूक सुधारत नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घ्यायला हवे” : भाजपा खासदारानी केली मागणी

“गुजरात सरकारने आपली चूक सुधारत नरेंद्र मोदी यांचे नाव मागे घ्यायला हवे” : भाजपा खासदारानी केली मागणी

February 26, 2021
Load More
  • Home

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143

No Result
View All Result
  • होम
  • आटपाडी
  • सांगली जिल्हा
  • सातारा जिल्हा
  • पुणे जिल्हा
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2021 Powered by Tushar Bhambare. 9579794143