मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील जे. जे. रुग्णालयात उद्धव ठाकरेंनी करोना लसीचा दुसरा डोस घेतला. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आली आहे. दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांनी करोना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी जे. जे. रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झाले होते.
११ मार्च रोजी उद्धव यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर बरोबर २८ दिवसांनी त्यांनी आज लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी कोव्हिशिल्ड या लसीचे डोस घेतले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस