आटपाडी : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील जनतेची आज दिनांक २१ रोजी सांयकाळी ७.०० वाजता थेट संवाद साधणार असून ते काय बोलतात याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
राज्यामध्ये दुसऱ्या टप्यात कोरोनाचे आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. या वाढत्या संसर्गजन्य विषाणूमुळे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन केले गेले आहे. तर आज पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या असून कोरोनाबाबत कोणतीही ह्यगय खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.
तर आजपासून पुण्यामध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून दिनांक २८ फेब्रुवारी पर्यंत सर्व महाविद्यालये बंद राहणार आहेत. त्यातच आज सायंकाळी मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार असल्याचे ते काय बोलतात? कोणता निर्णय लागू करतात याकडे साऱ्यांच्या नजर लागलेल्या आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस