डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपला राजीनामा राज्यपाल बेबी रानी मौर्य यांच्याकडे सोपवला आहे. एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलीय. त्यामुळे आता उत्तराखंडचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा सुरू झालीय.
राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आता दुसऱ्याला मिळायला हवी, असं पक्षाचं मत आहे. मी या पदावर कधी विराजमान होईन, याचा मी विचारही केला नव्हता. मात्र भारतीय जनता पक्षाने मला ही संधी दिली.असं केवळ भाजपमध्येच होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस