पुणे : जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थित होणार आहे. मात्र, आज पहाटे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहोचले आणि अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे उद्घाटन केलं.
यानंतर, गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे, जमावबंदीचे उल्लंघन करणे आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
