मुंबई : “आम्ही व्यक्तिविशेष कधीही टिप्पणी करत नाही. पण राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांचे विधान ज्या पद्धतीने त्यांनी स्वत: हून आपल्या वक्तव्यावरुन हे महाराष्ट्राला सांगितले, भाजप चंद्रकांत पाटील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतात. पण त्यांच्या पक्षाचे सर्वेसर्वा इतर कोणत्याही मतदारसंघात उभं राहण्याची हिंमतही करत नाही. नेमकं चंद्रकांत पाटील यांचे हे विधान जयंत पाटील यांच्या मर्मी खूप खोलवर लागले दिसतं आहे,” असे खोचक टोला भाजप नेते राम कदम यांनी लगावला.

“आमचा जयंत पाटील यांना सवाल तुम्ही या आधी चंद्रकांत पाटील यांचा वय काढलंत. पण त्यांचं वय काहीही असलं, तरी स्वत: जिवाची चिंता न करता चंद्रकांत दादा कोरोना काळात महाराष्ट्राच्या गावोगावी फिरत होते. पण तुमचे सर्व मंत्री आणि सरकार एअर कंडिशन बंगल्यात स्वत: च्या जिवाची चिंता करत होते. हे अजूनही महाराष्ट्र विसरला नाही,” असेही राम कदम म्हणाले.
“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मारलेला बाण अचूक वर्मी लागलेला दिसतो आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. जयंत पाटील जे बोलले, त्यातून एकच सिद्ध होते की, चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंत पाटील यांच्या बॉसला हे अजूनही जमत नाही,” असेही वक्तव्य करत राम कदम यांनी ट्वीट केले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
