नवी दिल्ली : सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले असून आता विद्यार्थ्यांना अखेर विषयनिहाय परीक्षेची तारीख समजणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे. ही परीक्षा 4 मे ते 10 जून या काळात ऑफलाईन पद्धतीने होणार आहे.
4 मेपासून सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा सुरु होणार आहेत. आपण कोरोनातून हळूहळू मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत, असल्याचे रमेश पोखरियाल निशंक म्हणाले. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
एप्रिलममध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेचे अॅेडमिट कार्ड मिळण्याची शक्यता आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी करण्यात आल्यामुळेच यंदाच्या परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत.
देशभरातील अनेक परीक्षा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या शालेय परीक्षा घेण्यास सुरुवात झाली. परीक्षेच्या वेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व शाळांमध्ये 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षांचा निकाल जुलै 2021 पर्यंत घोषित होईल, असा अंदाज आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
