मुंबई : कोणीही अनोळखी व्यक्ती सर्च इंजिन गुगलवर सर्चद्वारे WhatsApp चे प्रायव्हेट ग्रुप शोधू शकते, इतकंच नाही तर प्रायव्हेट ग्रुप जॉइनही करु शकते. WhatsApp मधील ही त्रुटी सर्वप्रथम 2019 मध्ये समोर आली होती, त्यानंतर उणीव दूर करण्यात आली. पण आता पुन्हा एकदा ही समस्या उद्भवल्याचे समोर आलं आहे.
इंटरनेट सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजाहरिया यांनी WhatsApp ग्रुपच्या इन्व्हाइट लिंक Google सर्चवर उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. गुगलवर सर्च केल्यास व्हॉट्सॲप युजरची प्रोफाइल दिसत असून यामुळे लोकांचे फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो सामान्य गुगल सर्चवर समोर येऊ शकतात असा दावा त्यांनी केलाय. आपल्या दाव्याला बळकटी देण्यासाठी राजशेखर राजाहरिया यांनी गुगलवर सर्च केलेले काही स्क्रीनशॉटही शेअर केलेत. WhatsApp Group Chats इंडेक्सची माहिती असल्यास WhatsApp ग्रुप लिंकला वेबवर सर्च करता येतं. या लिंकवर क्लिक करुन कोणीही प्रोफाइल फोटो, फोन नंबर यांसारखी महत्त्वाची माहिती मिळवू शकतं. इतकंच नाही तर ती व्यक्ती त्या ग्रुपला जॉइनही करु शकते असा दावा करण्यात आला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
