मुंबई : “भंडाऱ्यात एवढी गंभीर घटना घडूनही अजून कसलीही कारवाई झालेली नाही. FIR दाखल झालेला नाही. केवळ पाच लाख रुपये दिले, म्हणजे चालतं का? हे सरकार बालकांचं हत्यारं आहे,” असा आरोप भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला.

“खारघरमध्ये महिलेसोबत सामूहिक बलात्कार झाला. पुण्यातही अशाप्रकरची घटना घडली. साताऱ्यातही मुकबधीर मुलीवर बलात्कार झाला. पण सरकार याची दखल घेत नाही. आम्ही बलात्कार किंवा महिलांवर अन्याय झालेल्या घटनांची तात्काळ दखल घेतो. पण गृहमंत्री बलात्कारांना क्लीन चिट देत आहेत,” असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.
“बलात्काराच्या घटना दररोज घडत आहेत. खारघरमधील एका बलात्कार प्रकरणाचं कनेक्शन सत्ताधारी मंत्र्यांच्या जवळ जातं, औरंगाबाद प्रकरणाचं पुढे काय झालं, स्वत: पोलीसच आरोपीला वाचवत असतील तर?” असा खोचक सवालही चित्रा वाघ यांनी केला.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
