सांगली : चोरीचे सोने विक्री करणेकरीता सराफ कटटा सांगली आलेल्या दोन महिलांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले यांनी घरफोडी जबरी चोरी, मोटार सायकल चोरी या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी याना चेक करुन त्याचे कडुन गुन्हे उघड करण्याबाबत करण्याबाबत सुचना केल्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घरफोडी जबरी चोरी, मोटार सायकल चोरी या गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी याना चेक करुन त्याचे कडुन गुन्हे उघड करणेकामी एक खास पथक तयार केले.
दि.०९.१२.२०२० रोजी विटा पोलीस ठाणे हद्दीतील शाहुनगर येथे अज्ञात इसमांनी बंद घर फोडुन सोन्या- चांदीचे दागिणे चोरी गेल्या बाबत फिा सौ. तुप्ती रविंद्र लिमये रा. शाहुनगर विटा यांनी या बाबत विटा पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती. सदर गुन्हयाचे ठिकाणी भेट देऊन गुन्हयाचे माहिती घेऊन पुढील तपास चालु होता. गुन्हयाचे अनुषगाने रेकॉर्डवरील आरोपी यांची माहिती घेत असताना सपोफौ/मारूती सांळुखे यांना खास बातमीदामार्फत बातमी मिळाली की, दोन महिला या चोरीचे सोने विक्री करणेकरीता सराफ कटटा सांगली येथे येणार आहेत. सराफ कट्टा सांगली येथे नागोबा मंदिर चौकामध्ये दोन महिला संशयीतरीत्या घुटमळताना दिसल्या. तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने त्यांना महिला पोलीसांच्या मदतीने थांबवून त्यांची नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) हेमा धर्मु चव्हाण वय- २७ वर्षे रा. लक्ष्मीनगर, विटा २) नंदा रमेश चव्हाण वय- ४५ वर्षे रा. लक्ष्मीनगर, विटा असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे मिळाले माला बद्दल सखोल चौकशी केली असता त्यांनी शाहुनगर विटा येथुन आम्ही दोघींनी एक बंद असले राहते घरात रात्रीच्या वेळी घर फोडून चोरी केले असल्याचे सांगितलेने.
त्यांचे कब्जात सोन्याचे दागिणे कि. १,४४,०८०/- रू.चा मुद्देमाल व २ कि. १८० ग्राम. चांदीचे ताटे, पुजेचे साहित्य इसम नामे विशाल जवळे रा. २४ कॅरेट बिल्डींग विटा खानापुर रोड विटा यास विकले असल्याचे सांगितले. सदर गुन्हयातील सोन्याचे दागिणे सपोफौ/मारूती साळुखे यांनी सविस्तर पंचनाम्याने जप्त करून पुढील तपासकामी विटा पोलीस ठाणे येथे रिपोर्टने आरोपी मुदेमाल जमा करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक, अभिजीत सावंत, सपोफौ/मारूती सांळुखे, पोहेकाँ/सुनिल चौधरी,जितेंद्र जाधव, मच्छिंद्र बर्ड, पोना राहुल जाधव,पोकाँ सोहेल कार्तियानी,अजय बेंद्रे ,मपोना शुभांगी मुळीक,विमल नंदगावे,कॅप्टन गुंडवाडे तसेच विटा पोलीस ठाणेचे पोनि/शेळके व त्यांचेकडील स्टाफ यांनी पार पाडली.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
