आटपाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे गुप्तेहर प्रमुख बहिर्जी नाईक यांची बानुरगड ता. खानापूर जि. सांगली येथे भव्य स्मारक उभारण्यात यावे अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेमध्ये केली.
बहिर्जी नाईक हे स्वराज्याच्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवाती पासुन ते महाराजांच्या निधना पर्यंतचा चे साक्षीदार होते. दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा शिवाजी महाराज मोहिमेवरती असतांना त्यांना भेटले महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली,बहिर्जी नाईक स्वराज्य निर्मीतीच्या कामात हिरा आहेत हे महाराजांनी ओळखले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले व गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले.
गुप्तहेर खात्याची त्यांनी एक भाषाच तयार केली होती ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे त्यात पक्षांचे, वाऱ्याचे आवाज असे कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे.
त्याच बहिर्जी नाईक यांचे भव्य-दिव्य असे स्मारक बानुरगड येथे उभे करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेमध्ये केली आहे.
Join Free Whatasup Group माणदेश एक्सप्रेस



