औरंगाबाद : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशात सर्वांचे लक्ष्य केंद्र सरकार सर्वांसाठी मोफत लसीची घोषणा करणार का ? याकडे आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी विनंती केंद्र सरकारला केली आहे.

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडत आहे. अनेक राज्यांनी कोरोना लस मोफत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र केंद्र सरकारमधील मंत्र्यांची वक्तव्य संभ्रमात टाकणारी आहेत. अशातच आता राजेश टोपे यंदाच्या अर्थसंकल्पात मोफत लसीकरणाची तरतूद करावी अशी विनंती केंद्राला केली आहे.
दरम्यान, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
