मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील पोलिसांची खाती स्वतःच्या बायकोच्या बँकेत वळवली, असा आरोप काँग्रेस नेते भाई जगताप यांनी केला होता. या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीसांनी एकेरी उल्लेख करत सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, अशा शब्दात सुनावले आहे.
ए भाई , तू जो कोण असशील – माझ्या वर बोट उचलायचं न्हाय ! पोलिसांची खाती तुमच्याच राज्यात तुम्ही ‘UTI बैंक / Axis बैंक’ ला योग्यता पाहून दिली होती ! लक्षात ठेव, सरळ रस्त्याने चालणाऱ्या माणसांना डिवसायचे न्हाय, असा एकेरी उल्लेख करत अमृता फडणवीसांनी भाई जगताप यांना उत्तर दिले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस