नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत. महाराष्ट्रामधील बीपीएलधारक लोकांना नि:शुल्क कोरोना लस द्यावी, केंद्र सरकारने सर्व खर्च वहन करावा, अशी मागणी करण्यात आलीय.
बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकारनं राज्य सरकार सोबत चर्चा करावी. स्थगिती उठविण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी. महाराष्ट्र-बेळगाव सीमा वादप्रकरणी बेळगावला केंद्रशासित राज्य करावा, अशी मागणी केली.
सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पंतप्रधान मोदींनी स्पष्टपणे सांगितले. कृषी कायद्यांवरील चर्चा सुरू आहे. यासह त्यांनी विरोधकांना शेतकऱ्यांशी बोलण्याचे आवाहनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत म्हणाले की, सरकार कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यास तयार आहे. यावर त्यांनी शेतकऱ्यांशीही बोलले पाहिजे, असेही त्यांनी विरोधकांना सांगितले.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
