मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. तर राजकीय नेत्यांसह अनेक बॉलिवूड कलाकारांना देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळीच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. आता बॉलिवूड अभिनेता गोविंदाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. सध्या गोविंदा होम क्वारंटाइन आहे.
अक्षयने ट्विट करत करोना चाचणी पाझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आज सकाळी माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाइन आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व सेफ्टी प्रोटोकॉल फॉलो करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी मी विनंती करतो की त्यांनी स्वत: कोरोना चाचणी करून घ्या आणि काळजी घ्या. लवकरच अॅक्शनमध्ये परत येईल” अशा आशयाचं ट्विट करत अक्षयने त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सगळ्यांना दिली आहे.
दरम्यान,गोविंदाची पत्नी सुनीताने गोविंदाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे. “आम्हाला आजच गोविंदाची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समजले. तो ठीक आहे, त्याला अत्यंत सौम्य लक्षणे आहेत, तो घरीच विलगीकरणात राहत आहे. आम्ही सतत डॉक्टरांनशी संपर्क साधतो, आणि त्याच्या लक्षणांवर लक्ष ठेवून आहोत,” असे त्याची पत्नी सुनीता म्हणाल्या.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस