मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा ‘थलायवी’ हा चित्रपट नियोजित दिवशीच प्रदर्शित होणार आहे. कंगनाने ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. तसंच आपण बॉलिवूड वाचवण्यासाठी पुढे आल्याचंही तिने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तरन आदर्श यांनी ‘थलायवी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबद्दल ट्वीट केलं आहे. यात त्यांनी प्रदर्शनाच्या तारखेत बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. येत्या २३ एप्रिलला हिंदी, तमीळ, तेलुगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, “त्यांनी मला इंडस्ट्रीमधून बाहेर काढण्यासाठी हर प्रकारे प्रयत्न केले. ते सगळे एकत्र येऊन मला त्रास देत होते. पण आज बॉलिवूडचे ठेकेदार करन जोहर आणि आदित्य चोप्रा लपून बसले आहेत. सगळे मोठे हिरो आज लपून बसले आहेत पण कंगना तिच्या टीमसोबत १०० कोटी बजेटच्या चित्रपटासोबत बॉलिवूड वाचवायला येत आहे.”
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस