मुंबई : बॉलिवूड अभिनेता शरमन जोशीच्या वडिलांचं निधन झालं आहे. गुजराती रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. अरविंद यांचं निधन नानावटी रुग्णालयात झालं. अरविंद जोशी यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.
अरविंद यांच्या निधनाने अभिनेते परेश रावल यांना देखील मोठा धक्का बसला आहे. परेश रावल यांनी ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. ट्विट करत ते म्हणाले, ‘भारतीय रंगभूमीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. जोशी कुटुंबाला या मोठ्या दु;खातून बाहेर येण्यासाठी देव शक्ती देओ..’
अरविंद जोशी यांनी गुजरातीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी काम केलं. ‘इत्तेफाक’, ‘शोले’, ‘अपमान की आग’, ‘खरीदार’, ‘ठिकाना’, ‘नाम’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
