मुंबई: राज्यात कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या वाढत असताना हॉस्पिटलमधील बेड कमी पडत आहेत. त्यातच रक्ताचाही तुटवडा आहे. केवळ सात ते आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळं चिंता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तरुणाईला रक्तदानाचं आवाहन केलं आहे.
आव्हाड यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील रक्तसाठ्याची सद्यस्थितीची माहिती दिली आहे. ‘ब्लड बँका रिकाम्या झाल्या आहेत. आपल्याकडं पुढचे सात-आठ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळं लोकांनी पुढं येऊन रक्तदान करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं तरुणांनी स्वेच्छेनं व नि:स्वार्थ भावनेनं पुढं यावं,’ असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे. ‘रक्तदान करा, जीव वाचवा’ असंही ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस