आटपाडी : आटपाडी पंचायत समितीच्या उपसभापती पदी आज भाजपचे दादासाहेब मरगळे यांची निवड करण्यात आली. आटपाडी पंचायत समितीवर भाजपच्या माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची एकहाती सत्ता आहे. यापूर्वी रुपेशकुमार पाटील यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसभापती पदासाठी निवडणूक घोषित करण्यात आली होती.
यामध्ये आज सर्वानुमते दादासाहेब मरगळे यांची उपसभापती पदी निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचा समर्थक कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. निवडीनंतर दादासाहेब मरगळे यांनी माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असणाऱ्या आटपाडी तालुक्याचे शिल्पकार श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशिर्वाद घेतले. यानंतर त्यांनी शहरातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.
माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अक्षय(शेठ) अर्जुन, विशाल(शेठ) अर्जुन, सतीश हुबाले, सर्जेराव मरगळे, अंकुश गावडे, रावसाहेब मरगळे, विजय मरगळे, हिंदुराव मरगळे व मान्यवर उपस्थित होते.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस