मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट असताना आता राज्यावर बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला चांगलाच सणसणीत टोला लगावण्यात आला आहे.
‘बर्ड फ्लू’मुळे फक्त पक्षी व कोंबड्यांच मरत नाहीत, तर ग्रामीण भागातला कुक्कुटपालन करणारा शेतकरी, त्यांचे कुटुंबही मरत आहे याचे भान केंद्रातल्या व ज्या राज्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा फैलाव होत आहे तेथील राज्यकर्त्यांना आहे काय? संकटे रांगेत उभीच आहेत. विरोधकांनीही कोंबड्यांच्या रक्षणावर बोलावे. स्वतःच्या सुरक्षेवर नंतर बोलावे, असा टोला सेनेनं भाजपला लगावला आहे.
‘नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतानाच बर्ड फ्लूचे नवे संकट शेतकऱयांवर कोसळले आहे. शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तानी, खलिस्तानी, चिनी, नक्षलवादी, माओवादी यांचा हात असल्याचे सरकारी मंडळींचे म्हणणे आहे. त्यामुळे आता ज्या कोंबड्या, पक्षी मरून पडत आहेत त्या त्यांच्या रहस्यमय हत्याकांडातही खलिस्तानी, पाकिस्तानी, नक्षलवाद्यांचाच हात आहे असे भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केले नाही म्हणजे मिळवले’ असा सणसणीत टोलाही भाजपला लगावण्यात आला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
