नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ओबीसी आरक्षणावरून राज्य सरकारला फैलावर घेतलं. ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आहे. राज्य सरकार ओबीसींचा डाटा देऊ शकलं नाही. त्यामुळे आरक्षण ठरवता येत नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. याचाच अर्थ जोपर्यंत सरकार डाटा देत नाही तोपर्यंत आरक्षण ठरवता येणार नाही. राज्य सरकार ओबीसींच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत असल्यानेच ओबीसींवर ही वेळ आल्याचं सांगत सरकारच्या विरोधात लवकरच आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.
14 महिन्यांपासून सरकारला डाटा गोळा करण्यासाठी वेळ होता. परंतु सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचं काम केलं आहे. सरकार उदासीन आहे. त्यांनी आयोग स्थापन केलाच नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असून आता ओबीसींना आरक्षित जागेवर निवडणूकही लढवता येणार नाही, असं बावनकुळे यांनी सांगितलं.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस