मुंबई : अलिबाग येथील कोर्लई तसेच महाकाली गुंफा जमीन प्रकरणी सातत्याने आरोप करुन आपली, आपल्या कुटुंबाची तसेच पक्षाची नाहक बदनामी करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतीमा मलिन करुन मानसिक दिला,’ असा आरोप करत शिवसेनचे आमदार रविंद्र वायकर यांनी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
‘अलिबाग कोर्लई येथील संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संयुक्तरित्या खरेदी केलेल्या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आणि वरील माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात लपविण्यात आल्याचा दावा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध समाजमाध्यमांद्वारे केला होता. यावेळी या जमिनीवरील बंगल्याचा वापर व्यवसायासाठी केल्याचा तसेच या दोघांमधील आर्थिक हितसंबंध काय आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला होता. परंतु त्यांच्या या सर्व निराधार आरोपात काहीच तथ्य नसल्याने सोमय्या या प्रकरणी तोंडघशी पडले,’ असा हल्लाबोलही रवींद्र वायकर यांनी केला आहे.
‘या दोन्ही प्रकरणी वायकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यास पत्र देऊन बेताल व बिनबुडाचे वक्तव्य करुन जनमानसातील लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करणार्याु किरीट सोमय्या यांना लगाम घालण्याची उचित ती कारवाई करा,’ अशी मागणीही रवींद्र वायकर यांनी याआधी केली आहे.
अखेर आमदार रविंद्र वायकर यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात रुपये 100 कोटींचा अबुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. एवढंच नाही तर लवकरच याप्रकरणी ते क्रिमीनल दावाही दाखल करणार असल्याचे वायकर यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात किरीट सोमय्या यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस