मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात केल्यानंतर भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
अखेर सचिन वाझेंना अटक झाली. मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील ओसामा बीन लादेनला अटक झाली आहे. सचिन वाझे आणि त्याच्या गँगला पाठिशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा देखील राजीनामा घ्यायला पाहिजे, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत सचिन वाझे ओसामा बीन लादेन आहे का हा जो शब्द वापरला होता. त्या मुख्यमंत्र्यांनी देखील नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला पाहिजे. “सचिन वाझेंच्या माध्यमातून एनआयएने मनसुख हिरेनची केस घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अनेक आत्महत्यांचे गूढ देखील उलगडले पाहिजे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस