सातारा : एकीकडे राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुरू आहे तर दुसरीकडे भाजपला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. आता साताऱ्यात सुद्धा भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना राष्ट्रवादीने मोठी ऑफर दिली आहे.

आता तर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उघडपणे शिवेंद्रराजे यांना ऑफर दिली आहे. ‘शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरपालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत आले तर तेच पालिकेच्या निवडणुकीत नेतृत्व करतील आणि पॅनेल उभं करतील. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कधी राजकारण आले नाही, रामराजे यांच्या माध्यमातून सगळेजण एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करतील, अशी ऑफरच शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
