
जालना : परभणीसह अनेक राज्यातील घटना पाहता राज्यात हळू हळू बर्ड फ्ल्यूच्या आजाराने डोकं वर काढण्यास सुरु केली आहे. बर्ड फ्ल्यूचा डेथ रेट हा 10 ते 12 टक्के असून हा आजार अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट लवकरात लवकर घोषित करणं गरजेचं आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
राजेश टोपे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हा इशारा दिला. बर्ड फ्ल्यूबाबत राज्यात हायअलर्ट देण्याची गरज आहे. कारण या आजाराचा मृत्यू दर 10 ते 12 टक्के आहे. हा अतिशय धोकादायक आजार आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. परभणी जिल्ह्यात शेकडो कावळे बर्ड फ्ल्यूमुळे मरण पावले आहेत. त्यामुळे आजाराचा प्रसार तातडीने रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने हायअलर्ट जारी करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज
