मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर असणाऱ्या आरोपामुळे त्यांचे मंत्रिपद जाणार अशी चर्चा रंगली होती. परंतु, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री उशिरा प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये धनंजय मुंडे यांना दिलासा देण्यात आला आहे.
मुंबईत शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांची रात्री उशिरा बैठक बोलावली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या घरी ही बैठक पार पडली. यावेळी जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आदी नेते बैठकीस उपस्थितीत होते. या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्यावर पक्षांतर्गत कोणतीही कारवाई होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असून राजीनामा देण्याची शक्यता मावळली आहे.
रेणू शर्मा या महिलेनं धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहे. परंतु, तीच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली आहे. इतर लोकांना ही फसवत असल्याच्या घटना समोर आल्या आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहे. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
रेणू शर्मा नामक एका महिलेने मुंडेंवर बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळाल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान मुंडेंनी हा आरोप चुकीचे असल्याचे सांगत पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
