डोबिंवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकी आधी मनसेला मोठा धक्का बसला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विद्यार्थी सेनेपासून सहकारी असलेल्या राजेश कदम यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम यांच्यासह इतरही अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राज ठाकरे यांच्या ठाणे जिल्हा आणि मुंबईतील प्रत्येक सभेच्या सुरुवातीला मोठ्या आवाजात घोषणाबाजी करणारे म्हणून राजेश कदम यांना राज ठाकरे व्यक्तिगत ओळखत होते. राजेश कदम यांच्यासह युवा कार्यकर्ते शिवसेनेतून राज ठाकरे यांच्या मनसेत आली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून आपण दुर्लक्षित आहोत, असं म्हणत राजेश कदम आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
